हिवरखेड मधील नाल्या व रस्त्याची अंत्यत दुरावस्था,वार्ड क्र २ मधील दुर्गा माता मंदिर जवळील नालीची अत्यंत दैनिय व्यवस्था..


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड गावातिल नाल्या व रस्त्यांची अंत्यत दैनिय व्यवस्था  झाली असून  गावातील रहिवाशांना अतिशय त्रासाचा सामना करावा लागत आहे, गावातील रस्ते नाली बांधकाम नवीन बांधतात आणि दोन महिन्यांच्या आत रस्ते नाल्या उखडात हा नेमका प्रकार आहे कसा याबाबत चौकशी का कोणी करत नाही असा संतापजनक प्रशन नागरिक उपस्थित करतात,  लाखो रुपये निधी शासन यांना व्यवस्थित रित्या बांधकाम करण्यासाठी देतो आणि हे बऱ्याच ठिकाणी निकुष्ठ दर्जाचे बांधकाम करून स्वतःच सरळ करतात, अशी बाब हिवरखेड फतेपुरी समशान भूमी मार्गाची झाली हा मार्ग  बांधून बरोबर तीन वर्षे नाही झाले आणि या रस्त्यावर वापरलेल्या लोखंडी शिखा उघड्या पडल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत असून हा रस्ता मनुष्य जातीतील आखरी रस्ता असल्याचे बोलले जाते,तसेच वार्ड क्र २ मधील सुद्धा दुर्गा माता मंदिर जवळील नाली मोठी नाली असून अत्यंत दैनिय अवस्थेत दिसून येते ही नाली येत्या पावसात वाहून जाणार असे आढळून येते या बाबत येतील रहिवाशांनि बऱ्याचदा ग्रामपंचायतला तक्रारी दिल्या परंतु ग्रामपंचायतने हेतुपुरस्सर या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे येथील रहिवासी बोल्त आहेत, गावातील या अशा जीर्ण अवस्थेत असलेल्या नाल्या व रस्ते व्यवस्थित करून दर्जेदार बांधकाम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहे,

Previous Post Next Post