जळगांव जा.प्रतिनिधी
दिनांक 21 मे 2022 रोजी जळगाव जामोद येथे पानवेल व पानपीपरी ह्या शेती उत्पादनाचे औषधी वनस्पती मध्ये समावेश करून संशोधन केंद्र व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक, सामजिक व राजकीय मागासलेपणा दूर व्हावा याकरिता बारी समाजाचे संत श्री रुपलाल महाराज यांच्या नावाने विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे.तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवून ओबीसी आरक्षण शिवाय कुठल्याही निवडणुका घेण्यात येऊ नये. अश्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केलेविशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादांनी सर्व मागण्यांचे स्वतः त्याचक्षणी अवलोकन करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.ह्याप्रसंगी श्रीकृष्ण केदार, संजय ढगे, अर्जुन घोलप, उपस्थित होते तर यांच्यासह सखाराम ताडे व सौ आरती केदार यांच्या सहिनीशी निवेदन सादर करण्यात आले.
