अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाल्या वरून आज दि 22/05/2022 रोजी ग्राम सावरा येथील विनोद ऊर्फ नाना मधुकर सपकाळ यांचे घरी रेड केली असता हा त्याचे राहते घरी अवैधरित्या विनापरवाना विक्रीचे उद्देशाने देशी दारू बाळगून आहे अशा माहितीवरून पो. स्टे.अकोट ग्रामिणचे पी यस आय विष्णू बोडखे,पो.शी. वामन मिसाळ,पो.शी.गोपाल डाबेराव, पो.शी.सचिन कुलट,व म.पो.शी. रोशनी अस्वार यांनी ग्राम सावरा येथील विनोद उर्फ नाना मधुकर सपकाळ याचे घरी पंचा समक्ष रेड केली असता,त्याचे घरी देशी दारू कोंकण संत्रा 999 कंपनीचे 90 एम एल च्या 509 बॉटल किमती 20,360 रुपये चा मुद्देमाल पंचा समक्ष विनापरवाना अवैध रित्या विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून मिळून आला.त्यावरून सदरचा 20,360/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अकोट ग्रामीण पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई....
सय्यद शकिल-अकोट ता.प्रतिनिधी....
