अकोट तालुक्यातील गट ग्राम पंचायत असलेले ग्राम रामापूर येथील तलाठी राजेश बोकाडे हे रामापूर येथील तलाठी ऑफिस उघडून मुख्यालयी हजर राहत नसून अकोला वरून अपडाऊन करतात. त्यांनी अकोट येथे प्रायव्हेट ऑफिस भाड्याने केले असून ''उंटा वरून शेळ्या हकालतात'' या बाबत जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.त्या तक्रार अर्जाची मा.जिल्हाधिकारी अकोला यांनी दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अकोट यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे.रामापूर येथील तलाठी यांनी रामापूर येथील सचिव यांना रामापूर येथील तलाठी ऑफिस समोरील अतिक्रमण काढून मोकळे करावे या करिता लेखी पत्र दिले होते.त्या पत्राप्रमाणे रामापूर सचिव यांनी रामापूर येथील अतिक्रमण धारक चौघांना सुद्धा ग्राम पंचायत मार्फत नोटीस बजावली होती.त्या नोटीस प्रमाणे काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले व राहिलेलं अतिक्रमण सचिव यांनी काढले व तसा अहवाल सुद्धा अकोट तहसीलदार,बीडीओ यांचेकडे दाखल केला आहे.तरी सुद्धा रामापूरचे तलाठी यांनी रामापूरचे तलाठी ऑफिस उघडून आज परंत सुद्धा मुख्यालयी हजर झालेले नाहीत.अकोट तहसीलदार यांनी तलाठी यांना रामापूरचे ऑफिस उघडण्याचे आदेश दिल्यावरून तलाठी यांनी रामापूर येथील तलाठी ऑफिस उघडून साफसफाई केली व दोन दिवस थातुरमातुर ऑफिस उघडले व पुन्हा दररोज रामापूरचे तलाठी ऑफिस बंदच आहे.व तलाठी यांनी कामकाज पाहणे साठी अकोट येथील खाजगी वयक्ती कामाला ठेवला आहे.तोच वयक्ती वाटेल त्या वेळेस अकोट येथील ऑफिस उघडून स्वतःच्या मर्जीप्रमाणे कामकाज पाहतो.हा वयक्ती कुठलाही शासकीय कर्मचारी नसतांना यांचेकडे रामापूरचे तलाठ्यांचे कामकाज पाहण्यासाठी कोणी आदेश दिले,कोणाच्या मर्जीप्रमाणे धांडे हे कामकाज पाहतात या बाबत सविस्तर चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई होणे गरजेचे आहे.व तलाठी यांना रामापूरचे तलाठी ऑफिस उघडून मुख्यालयी हजर होण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.तरी रामापूर येथील तलाठी व खाजगी वयक्ती विरुद्ध चौकशी करून कुठली कारवाई करण्यात येते याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.
अखेर रामापूरचे तलाठी विरुद्ध चौकशीचे आदेश....!जिल्हाधिकारी अकोला यांनी दिले उपविभागीय अधिकारी अकोट यांना लेखी पत्र.....!
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...
