गौलखेडा बाजार येथे आरोग्य रोगनिदान शिबिराचा कार्यक्रम सपन्न....


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी....

चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आज दि. २५/५/२०२२ ठिक ११ वाजता पासून भव्य आरोग्य रोगनिदान शिबिराला सुरुवात झाली होती. या शिबिराच्या कार्यक्रमात अकरा गावातील महीलानी हजेरी लावली असुन यात जवळपास ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरात रुग्णांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या कार्यक्रमाला डॉ प्रधान तालुका आरोग्य अधिकारी चिखलदरा, डॉ. आदित्य पाटील वैद्यकीय अधिकारी सलोना, स्त्रीरोग तज्ज्ञ कल्पना कांबळे, डॉ. विद्या कांबळे, डॉ. राईकवार, डॉ. माहुलकर, डॉ. दाभाडे, डॉ. खोब्रागडे, तसेच ईतर डॉ. अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित असुन या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात आले असून औषधोपचार करण्यात आले आहे. या शिबिराचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


Previous Post Next Post