पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती महेंद्र बांगर यांची अविरोध निवड...


मंगल काकडे जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..

जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या पिंपळगाव काळे  ग्रामपंचायत कार्यालयात २६/५/२०२२ गुरुवार रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये भारतीताई महेंद्र बांगर यांची सर्वानुमते अविरतपणे निवड करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा महिला राज प्रस्थापित झाले. आहे.सध्या पिंपळगाव काळे च्या सरपंच पदी महिलाच असून उपसरपंच पदाचा मान सुद्धा पुन्हा एकदा महिलेलाच मिळाला आहे.जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव काळे च्या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते.ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे.काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांनी गावपातळीवर युतीचा निर्णय घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून बहुमत प्राप्त केले आहे. या अगोदर उपसरपंच पदी असलेल्या यशोदाताई घटे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ,त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर २६ मे २०२२ गुरुवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. गावपातळीवर राजकारण न करता विकासाच्या दृष्टीने सदर निवडणूक यशस्वीपणे पार पडली आणि  वंचीत बहुजन आघाडिच्या भारतीताई महेंद्र बांगर यांची एक मताने  उपसरपंच पदी निवड करण्यात आली. व गावाचा विकास  आणि ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसंरपंच भारती ताई बांगर यांनी सांगितले. यावेळी  ग्रामसेवक ढगे साहेब व ग्रामपंचायतीच्या सरपंच आशाताई कळसकार. नवनिर्वाचित उपसरपंच भारतीताई बांगर ,माजि उपसरपंच यशोदाताई घटे, ग्रामपंचायत सदस्य उषाताई चोखंडे, वंदनाताई निकम,प्रितीताई तायडे,दुर्गाताई मांडोकार. राधीकाताई राऊत,अर्चनाताई हरमकार, अजय ताठे, सचिन जाधव, नवलसिंग मावळे, शे हारुण अत्तार, नवल गोतरकर, अशोक ढोले, विनोद बहादरे, विलास मांडोकार, सर्वच सदस्य हजर होते. यावेळी ग्राम पातळीवर विकासाच्या दृष्टीने राजकारणाला दूर ठेवून उपसरपंच पदाचीमाळ वंचीत बहूजन आघाडिच्या भारतीताई बांगर यांच्या गळ्यात टाकली.त्यासाठी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई,विनोद गवई,सर्कल प्रमुख हरिदास वाघमारे,ग्रामशाखा अध्यक्ष सुधाकर घटे, किशोर वाकोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील,वंचीतचे तालुका अध्यक्ष  संतोष गवई यांनी सहकार्य केले.यावेळी सुपडा पाटील.युनूस अतार,सुनील कळसकार,बाळू निकम, गोपाल तायडे, महेंद्र बांगर,महादेव घुटे,सचिन अरुण अवचार,अमोल बांगर,ठाकूर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुपडा बांगर उमेश मांडोकार यावेळी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post