जळगाव शहरातील अनेक तरुण युवकांचा आ डॉ कुटे यांच्या हस्ते भाजपा त पक्ष प्रवेश...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

माजी मंत्री तथा जळगांव जामोद मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ संजय कुटे यांची कार्यशैली व समाज बांधवांसाठी आजपर्यंत केलेल्या विकास कामांची  प्रेरणा घेऊन जळगाव जामोद शहरातील पंचशील नगर, सिद्दर्थ नगर तसेच गौतम नगर मधील अनेक तरुण युवकांनी भारतीय जनता पक्षात दिनांक 2 मे रोजी प्रवेश घेतला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला माजी जिल्हापरिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकळे, माजी उपाध्यक्ष न प शेगाव नितीन शेगोकार, माजी नगरसेविका रत्नमालाताई ठवे, माजी नगरसेविका रजनीताई पहुरकर, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख व नानाराव धंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून सदर युवकांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी प्रकाश थोर, महिंद्रा नितवणे,सुरेश वाघोदे, अक्षय नितवणे,सदानंद हेलोडे,अभिमन्यु वानखडे, अजय धुंदाले,सिद्दर्थ थोर,सुरेश अवचार, भास्कर धुंदाले,संतोष इंगळे, सचीन आगरकर, शंकर नितवने,प्रदीप थोर, आकाश लहासे, गोविंदा अवचार, रमेश थोर,धम्मपाल वाकोडे,रमेश वाघोदे,गौतम अंभोरे,राहुल खंडेराव, अर्जुन थोर, जितेश थोर, शाम इंगळे, योगेश वानखडे, सिद्धार्थ नगर मधील सुभाष वानखडे, सागर तायडे, पिंटू जाधव,कपिल वानखडे,विनोद वानखडे, राजु तायडे,सुमेध वानखडे,अजय वानखडे,पवन मोरे, राहुल शिरोळे, ईश्वर तायडे, आदेश वानखडे तर गौतम नगर मधील लखन म्हसाळ, अमर चांडाले, राज कोल्हे,स्वप्नील कळमकार,निखील तायडे, अतुल माने, अमर इंगळे, कपील तायडे,विकी वानखडे आदींसह अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टी त प्रवेश केला.यावेळी ज्ञानदेवराव भारसाकळे, नीतीन शेंगोकार यांचे मार्गदर्शन झाले तर आ डॉ संजय कुटे यांनी बोलताना आपण सबका साथ सबका विकास या उक्ती प्रमाणे काम करणारा कार्यकर्ता असून सर्व समाजाचा सर्वांगीण विकास साधने हे माझे कर्तव्यच आहे, मला बाबासाहेबाना अपेक्षित असा हा भारत देश निर्माण झालेला बघायचा असल्याने कोणत्याही भूलथापांना आपण बळी न पडता या विकास कार्यात साथ द्यावी असे आवहान केले. कार्यक्रमाचे संचाल न हे प्राध्यापक राजेश गोटेचा यांनी केले तर आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले. यावेळी शहर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post Next Post