चिखलदरा तालुक्यातील एकमेव आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी चूर्णी ची निवडणूक घेण्यात आली असता यामध्ये दोन पॅनल आमने सामने उभे होते,यामध्ये प्रहार प्रणित परिवर्तन पॅनल व समता पॅनल चा समावेश होता. समता पॅनल चे तेराही उमेदवार भरघोष मतांनी निवडून आले. व प्रहार प्रणित परिववर्तन पॅनल चा एकही सदस्य निवडून न आल्याने त्यांचा धुव्वा उडाला. चूर्णी परिसरात यामध्ये राहुल येवले, सहदेव बेलकर, पुण्यकाका येवले, हरिभाऊ येवले, राजेंद्र येवले यांच्या सारख्या दिग्गज्यांचा समावेश असल्याने व त्यांनी पॅनल निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतल्याने त्यांची जीत निश्चित होती.चुरनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था र न ४२९ मध्ये युवा नेते राहुल येवले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल चे 13 पैकी 13 उमेदवार विजयी. प्रहार प्रणित परिवर्तन पॅनलचा धुव्वा. विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणेश्री-बाबुलाल बालाजी बेठेकर ,श्री.गोमा काळमा जामुनकर ,श्री भैयालाल बाबनु मावस्कर , श्री.रामप्रसाद सुखराम पंडोले ,श्री.लहुजी भाना येवले,श्री.राजा येवले, श्री नारू मुंडे ,श्री.शंकर राजू भुसुम ,श्री गाणु टूचा भुसुम ,श्री.बाबुलाल सेलुकर ,सौ फुलकाय बाई तोटे श्री पुण्याजी येवले ,सौ रमलाबाई धुर्वे .
चूर्णी सोसायटीवर सहकार पॅनलचे वर्चस्व...प्रहार प्रणित परिवर्तन पॅनल चा पराभव...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
