भिंगारा,चाळीस टापरी, व गोमाल येथील आदिवासी बांधवांनी प्राथमिक गरजांसाठी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दिनांक 21 मे रोजी जळगाव जामोद तालुक्यात संवाद दौरा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कृतज्ञता सोहळ्यास आले असता जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, चाळीस टापरी व गोमाल येथील नागरिकांनी आपल्या प्राथमिक गरजासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन दिले सदर गावामध्ये स्वतंत्र्यच्या 75 वर्षीपासून मूलभूत गरजापासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी रस्ता नाही.गावात वीज नाही.गोमाल, चाळीस टापरी हे गाव अदयापही महसूल दर्जा नसल्याने मानवी विकासापासून वंचित. वन जमिनीचे पट्टे वाटपापासून आदिवासी बांधव वंचित या सर्व मागण्यांसाठी भिंगारा चाळीस टापरी व गोमाल येथील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिले निवेदन सदर निवेदन देतेवेळी तिन्ही गावातील नागरिक. सरदार अवासे, राधेश्याम खरात कमलसिंग सोळंकी, दित्तू डावर, सुमारसिंग मुझलदा व देविदास डावर आदी आदिवासी बांधव उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले.

Previous Post Next Post