राष्ट्रवादी च्या संकल्प सभेला हजारोंचा जनसमुदाय. एस के के कॉलेज चे मैदान हाउसफुल...



 जळगाव जा.प्रतिनिधी:-

दिनांक 20 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य अशा  संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. संकल्प सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,माजी मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल दादा मिटकरी, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत दादा पाटील आदी मान्यवर हजर होते.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार संकल्प सभेला येत असल्याने जळगाव जामोद तालुक्यात सह बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जळगाव शहरात दाखल झाले होते. अजित दादांना एकण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. अक्षरश: एस.के.के. कॉलेजच्या मैदानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कॉलेजचे मैदान कार्यकर्त्यांनी अगदी हाऊसफुल झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संकल्प सभेला संबोधित करताना सांगितले की, जळगाव जामोद शहरात बरिच वर्ष साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे वास्तव्य होते,त्यामुळे जळगाव जामोद शहरात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी बरिच  वर्षापासून केल्या जात होती...त्यामुळे शहरात कोल्हटकांचे भव्य असे स्मारक केल्या जाईल.जनतेला संबोधित करतांना त्यांनी पुढे सांगितले की,समृद्धी महामार्ग,वाढती महागाई तथा केंद्र सरकारच्या चुकिच्या धोरणांमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेळिच  केंद्राने योग्य पाऊल उचलले नाही तर श्रीलंकेसारखी परिस्थिती आपल्या देशावर यायला वेळ लागणार नाही...यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे,आमदार अमोल दादा मिटकरी, प्रसेनजीत दादा पाटील, जिल्हाध्यक्ष नाझेर काजी इत्यादी मान्यवरांनीही यावेळी सभेला संबोधित केले.

Previous Post Next Post