जळगाव जामोद येथील सामाजिक व युवा कार्यकर्ते राजेश लहासे यांनी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रवेश घेतला होता. राजेश लहासे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची बुलढाणा जिल्हा उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, महाराष्ट्राचे सचिव गणेश भाऊ पुरोहित यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद व जालना जिल्हा संपर्कप्रमुख वैभव राजे मोहिते यांनी केली आहे .तसे नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे . राजेश लहासे यांच्यावर जळगाव जामोद, खामगाव ,मलकापूर या तीन विधानसभा मतदार संघाची व मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद, या सात तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने पक्षबांधणी ला वेग येणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा उपप्रमुख पदी राजेश लहासे यांची नियुक्ती..
जळगांव जा.प्रतिनिधी:-
