गेल्या दोन ते तीन वर्ष कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशातील नागरिकांना हैराण करून सोडले होते नागरिकांचे खाण्याचे वांदे झाले होते या कारणास्तव शासनामार्फत गरिब व गरजु शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य पुरवठा करण्यात आला होता व आजपर्यंत चालू आहे यामध्ये शिधापत्रिका धारकांना तांदूळ देण्यात येतो मात्र तेल्हारा तालुक्यात या पांढऱ्या तांदूळाचा काळाबाजार चालू आहे मोठ्या प्रमाणात तांदूळ माफिया सक्रिय झाले आहेत इतर जिल्ह्यातील व जिल्ह्यातील माफिया या गरिब,गरजु नागरिकांन जवळुन प्रतिकिलो 9 ते 10 रूपये प्रमाणे तांदूळ विकत घेतात टु व्हीलर,407,बोलेरो पिकप,ट्रक्टर व्दारे दिवसाढवळ्या अवैध रित्या वाहतूक करून इतर जिल्ह्यात नेताना दिसुन येत आहेत तेल्हारा व तेल्हारा तालुक्यासह भांबेरी, मनब्दा,अटकळी,पंचगव्हाण, दहिगाव,दापुरा,निंबोळी, या परिसरात तांदूळ माफियांचा उत आलेला आहे.या अवैध रित्या तांदुळाची वाहनाव्दारे चोरटया मार्गाने वाहतूक करण्यासाठी त्या मार्गाने येणाऱ्या प्रत्येक पोलीस चौकी व तहसील कार्यालयातील संबधित विभागाला मोठी रक्कम दिली जाते अशी चर्चा पुर्ण परिसरात रंगत आहे याच पद्धतीने तेल्हारा तालुक्यातील पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातील संबंधित विभागाला 70 ते 80 हजार रुपये पर्यंतची मोठी रक्कम दर महिन्याला तांदूळ माफियांन कडून मिळत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे तर गावागावात दलाला मार्फत हे माफिया तांदूळ जमा करून टु व्हिलर,व इतर जड वाहनांनी वाहतूक करित आहेत. मात्र हा रेशनचा तांदूळ जातो तरी कुठे?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे विश्वनिय सुत्रांच्या माहितीनुसार हा गरिब,गरजु नागरिकांना मिळणारा तांदूळ मध्यप्रदेश मध्ये जात असून मोठ्या किंमती मध्ये काळयाबाजारात विकल्या जाऊन पुन्हा तोच तांदूळ मध्यप्रदेशातील माफिया कडून रेशन दुकानात येतो अशी चर्चा होत आहे या कारणास्तव पोलीस प्रशासन, तहसील कार्यालयातील संबंधित विभाग व तांदूळ माफिया याच्याकडून जीवनावश्यक वस्तू मध्ये येत असलेल्या शासकिय तांदूळात लाखोंच्या वर शासनाच्या तिजोरीला चुना लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे अशी नागरिकांन मध्ये चर्चा होत आहे तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
प्रतिक्रिया 1) "जीवनावश्यक वस्तू मध्ये येत असलेला रेशनच्या तांदूळचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू आहे यामध्ये अधिकारी व शासकीय कर्मचारी आपला उल्लु सरका करित आहेत हा शासकीय तांदूळ जातो कुठे याची चौकशी करण्यात यावी"
महेंद्र हेरोडे ग्रामस्थ तेल्हारा
प्रतिक्रिया 2) " महसूल विभागातील अधिकारी यांना कळवा आम्ही सुद्धा रेशनच्या तांदूळ माफियांची व संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देतो"
जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला
