जळगांव जा.प्रतिनिधी/
वैद्यकीय क्षेत्रात आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडे जाणाऱ्या दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार व निरोप समारंभ काल महाराष्ट्र दिनि १ मे रोजी स्थानिक जलाराम मंगल भवन मध्ये ब्रिलियंट अकॅडमी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्याच बरोबर नॅशनल ऑलिंपियाड, डॉक्टर होमी बाबा शिष्यवृत्ती, एम टी एस इ, एन टी एस इ, शिष्यवृत्ती नीट ,जीॲडव्हान्स आणि जी मेंन परीक्षा यांच्यामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच क्वीझ कम्पीटिशन आणि सेमिनार कॉम्पिटिशन मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार व गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. स्थानिक जलाराम मंगल भवन मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर तर ब्रिलियंट अकॅडमीचे मुख्य संचालक प्रमोदकुमार आमले हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक होते. जळगाव जामोद पालक संघटना तथा व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजय वानखडे ,एम.सी.एन,न्यूज संपादक राजीव वाढे,लोकमत तालुका प्रतिनिधी प्रा.कांडेलकर सर,जळगाव शिक्षण संस्थांचे अध्यक्ष अनिल कुमार जयस्वाल, माजी सरकारी वकील तथा माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खिरोडकार,काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या ज्योतिताई ढोकने यांची या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. दहावीनंतर आपल्या पाल्यांचे करिअर घडवू इच्छिणाऱ्या तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच बँकिंग क्षेत्रातील विविध पदांच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा.आम्ले सरांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.सदर सत्कार कार्यक्रमात जवळपास शंभर विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देण्यात आले हे चे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
