अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या मौजे चांगलवाडी ते रायखेड नवीन ३.२० कि.मी.किंमत रुपये २०३.१३ लक्ष रस्त्याच्या डांबरीकरणाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन पॅकेज क्रमांक RD-AKO-24 मधुन सन २०१७/१८ मध्ये मंजुरात मिळाली व या रस्त्याच्या कामाचे कंत्राट मे.चांडक कंन्स्ट्रक्शन यांनी घेऊन सन २०१८-१९ मध्ये कामाला सुरुवात कार्यकारी अभियंता ग्रा. र. वि. सं.अकोला यांच्या देखरेखीखाली केली आणि कासवगतीने काम करता करता आतापर्यंत हे काम सुरू ठेवले असुन अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून बरेचशे काम करणे बाकी असताना कामाच्या ठिकाणाहून सर्व यंत्रणा हलवली तर केलेलं काम पण निट केले नाही कारण या रस्त्याच्या कामातील अंदाजपत्रकात दाखवले गेलेल्या गाववस्तीतील सिमेंट काँग्रीट रस्ता या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरया तसेच आजुबाजुचे असलेले खडीकरण केलेच नाही व पॅसेचवर मुरुम टाकला नाही याचप्रमाणे पूर्ण रोडला पॅसेच न घेता रोड तयार केला केलेल्या रोडच्या कामात निकृष्ट दर्जाचे कमी मटेरियल वापरले यामुळे रस्त्याचे काम स्थराअभावी बारीक व दर्जाहीन झाले आहे. विशेष म्हणजे रस्त्याची रुंदी कमी तसेच रस्त्याच्या कडेला नसलेले पॅसेच याने दोन्ही कडील वाहतूक होणे शक्य नाही रस्त्यामध्ये असलेले पुल व्यवस्थित बांधले नाहीत असा विविध प्रकारचा भ्रष्टाचार या कामात झाला असून या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे
रायखेड चांगलवाडी रस्त्याचे डांबरीकरण बोगस करण्यात आले असून या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे तरी संबंधित वरिष्ठांनी याबाबत गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी
कासुबाई शिवणकर सरपंच चांगलवाडी
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन करण्यात आलेले रायखेड चांगलवाडी रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले असून दर्जाहीन काम केले आहे व या कामात संबंधितांचे हात ओले झाले आहेत
निलेश नेमाडे मा.सरपंच रायखेड
