स्थानिक हिवरखेड (रुपराव) तालुका तेल्हारा येथील प्रा मयूर बंडू लहाने यांना नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती कडून आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या संशोधनाचा विषय *नवोदोत्तरी वैदर्भीय ग्रामीण कादंबरीतील वर्तमान समाज वास्तव संस्कृती आणि वांड्मयीन दृष्टिकोन: एक चिकित्सक अभ्यास* हा असून, या विषयाच्या संशोधनासाठी श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ. विलास विश्वनाथ तायडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सदर प्रबंधात प्रा मयूर लहाने यांनी नवोदोत्तरी वैदर्भीय ग्रामीण कादंबरीतील वर्तमान व समाज वास्तवाचा संशोधनात्मक आढावा घेऊन वैदर्भीय कादंबऱ्यांचे महत्व सांगितले आहे. याकरता त्यांनी महत्वपूर्ण वैदर्भीय कादंबऱ्यांचा अभ्यास करून संशोधन केले आहे. त्यामुळे हा त्यांचा प्रबंध वैदर्भीय साहित्यिकांसाठी व अभ्यासकांसाठी फार महत्त्वपूर्ण ठरेल. ह्याकरता त्यांना मोलाचे सहकार्य त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ विलास तायडे. तसेच प्राचार्य गोपाल ढोले. प्रा डॉ अशोक इंगळे, प्रा डॉ ममता इंगोले, यांनी केले असून तसेच ते आपल्या यशाचे श्रेय वडील बंडू लहाने आई नलिनी व पत्नी वैष्णवी व मित्रपरिवार यांना देतात आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
प्रा मयूर बंडू लहाने आचार्य पदवीने सन्मानित...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
