राशन लाभार्थ्यांनी मिळत असलेले धान्य बाजारात विकू नये,तहसीलदार डॉ येवलीकर यांनी दिला सावधगिरीचा ईशारा,


 प्रतिनिधी/प्रदीप पाटील...

धान्याची विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांवर होणार कारवाई.पुरवठा विभागाकडून रास्त धान्य लाभार्थ्यांन करिता अधिक सूचना आल्या आहेत,   आजूबाजूच्या खेड्यापाड्या मधील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातील मिळणारा गहू, तांदूळ इतर  बाजारात जास्त भावाने विकून कायद्याचा भंग करू नये,  स्वस्त दुकानात धान्य शासन मोठ्या स्तरावरून लाभार्थ्यांना त्यांच्या कुटूंबाचे नियोजन सुरळीत चालविण्यासाठी लाभ मिळवून देतो ,परंतु बऱ्याच ठिकाणी मिळणारा लाभ बाजारात जास्त दरात विक्रीच्या  चर्चा आयकायला मिळतात  ,तेल्हारा तहसीलदार डॉ येवलीकर यांनी स्वस्त धान्य दुकानादाराना सूचना दिल्या आहेत जर कोणी हे धान्य बाजारात विकताना आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे प्रकार आपल्या गावात होत असतील तर दक्षता समितीने तत्काळ याची दखल घेऊन  आणि विकताना कोणी आढळल्यास पुरवठा  पुरवठा विभाग  तेल्हारा यांच्याशी संपर्क साधावा  असे आव्हान तेल्हारा तहसीलदार यांनी केले आहे .

असा कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ या कार्यालयाशी संपर्क साधावा

निलेश कात्रे

पुरवठा निरीक्षक तेल्हारा

Previous Post Next Post