अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना, नवी दिल्ली( रजि. S31 375) शाखा ,अकोट येथे बैठक संपन्न...।


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

 दिनांक २३ मे २०२२ वार सोमवारला  सायंकाळी ठीक ८.०० वाजता अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना, नवी दिल्ली च्या वतीने अकोट, जिल्हा अकोला येथे श्री धनराज भाऊ पारवे यांचे निवासस्थानी श्री भिकाजी पारवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम थोर समाजसेवक डॉक्टर संतूजी लाड यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. बैठकीमध्ये खालील विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली .  १) हिंदू खाटीक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करणे२) अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना, शाखा अकोट ची कार्यकारणी जाहीर करणे .३)समाजामध्ये येणाऱ्या विविध अडचणी व समस्या यावर चर्चा करणे..ह्या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. समाजामध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या जसे. जातीचे प्रमाणपत्र ,जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याकरिता येणाऱ्या अडचणी या कशा प्रकारे सोडवता येतील, याविषयी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष श्री चंदू भाऊ गोतरकर यांनी सविस्तर अशी माहिती दिली तसेच समाज व्यवसायिकांना व्यवसाय करण्याचा परवाना मिळण्याकरता ज्या अडचणी येत आहे , त्यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शाखा अकोट कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली .त्यामध्ये अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री धनराज भाऊ पारवे, तालुकाध्यक्षपदी श्री सेवक राम भाऊ पारवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी श्री सतपाल भाऊ एललकार यांनी संघटनेच्या विस्तारा विषयी आणि धोरणाविषयी इत्यंभूत माहिती दिली तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री उमेश भाऊ दुर्गे यांनी समाजाला एकजूट होण्याचे आवाहन केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मांडवे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून समाजातील ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता केव्हाही बोलवा मी सर्वतोपरी  मदत करण्यास तयार आहे , याविषयी आवाहन केले. ज्येष्ठ समाजसेविका सौ. इंदुबाई एललकार यांनीसुद्धा समाजाला एकत्र येऊन कार्य करणे विषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले.बैठकीला ज्येष्ठ मार्गदर्शक श्री भिकाजी पारवे , ज्येष्ठ समाजसेविका सौ. इंदुबाई एललकार ,महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष श्री चंदूभाऊ गोतरकर,  राष्ट्रीय सचिव श्री सतपाल भाऊ एललकार ,जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब मांडवे, प्रसिद्धी प्रमुख उमेश भाऊ दुर्गे, जिल्हा संघटन सचिव श्री संतोष भाऊ पवार ,जिल्हा उपाध्यक्ष श्री धनराजभाऊ पारवे ,तालुका अध्यक्ष श्री सेवकरामभाऊ पारवे ,श्री पांडुरंगजी पारवे, श्री प्रकाश जी पारवे विनोद भाऊ लोणारे ,अंकुश पारवे, सागर पारवे ,सचिन पारवे ,लक्ष्मण पारवे, राजूभाऊ पारवे ,महादेव मसनकार, पवन मसनकार ,राहुल मांडवे ,रोशन बाभनेकर, गजानन पारवे ,महेश पारवे ,अजय पारवे व असंख्य समाज बांधव बैठकीला उपस्थित होते .कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री चंदू भाऊ गोतरकर यांनी तर आभार प्रदर्शन राहुल मांडवे यांनी केले.

Previous Post Next Post