भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश तथा स्व. श्रीरामजी कुटे चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद द्वारा *खोजो कॅन्सर, मिटाओ कॅन्सर अभियान अंतर्गत* जळगाव जामोद मतदारसंघातील जनते करिता शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद आणि जामोद अश्या 4 ठिकाणी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शेगाव येथे 70 रुग्णांनी तपासणी करण्यात आली,वरवट बकाल येथे 70 रुग्णांनी तपासणी केली, जळगाव जामोद येथे 51 रुग्णांनी तर जामोद येथे 140 रुग्णांनी तपासनी केली. भाजपाचे स्व. काकाजी गांधी यांच्या जयंती निमित्ताने शारदा ज्ञानपीठ जामोद याठिकाणी आयोजित तिसऱ्या शिबिराने या अभियानाची सांगता आज जामोद येथे करण्यात आली.या सत्कार्यात बुलडाणा अर्बनचे डॉ किशोर केला यांनी वरवट आणि जळगाव जामोद येथे सहकार विद्या मंदिर चे प्रांगण उपलब्ध करून दिले. सदर शिबिराकरिता डॉ अपर्णा ताई कुटे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी शेगाव मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे व त्यांचे सहकारी पदाधिकारी, संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश राठी व त्यांचे सहकारी पदाधिकारी, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील व जळगाव जामोद शहर अध्यक्ष अभिमन्यु भगत व त्यांचे सर्व सहकारी. यांचेसह डॉ अमोल कुकडे, डॉ अंजुषा भुतडा, डॉ प्रकाश बगाडे, डॉ संदीप दुधमल, डॉ अशोक टावरी, राजेंद्र गांधी या सह अनेक प्रतिष्ठित नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
जळगाव जामोद मतदारसंघाची कॅन्सर मुक्तीकडे वाटचाल..!जळगाव जामोद मतदारसंघातील कॅन्सर मुक्त अभियानाची जामोद येथे सांगता..जामोद येथे 140 रुग्णांनी केली तपासणी.मतदारसंघातील 300 पेक्षा जास्त रूग्णांची तपासणी करण्यात आली...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
