तीन रुग्णालयांनी टेकले हात पीडियमसीने दिले जीवनदान... जिल्हा शल्यचिकित्सकांनी उचलला खर्चाचा भार,डॉक्टरांनी जोखमीच्या सिकलसेल महिलेत फुंकले प्राण...!


राजु भास्करे/ अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटच्या आलाडोह गावातील सिकलसेल आजाराने पीडित गर्भवती महिलेची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्यावर तीन सरकारी रुग्णालयांनी जेथे हात टेकले तेथे पीडियमसीच्या डॉक्टरांनी सिकलसेल गर्भवती मातेमध्ये प्राण फुंकल्याने ती महिला आणि बाळ दोन्ही सुखरूप आहे सिकलसेल महिलेला व तिच्या बाळाला जीवनदान देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांनी घेतलेली मेहनत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नरवने यांची रुग्णाप्रती असलेली तळमळ दिसून आली त्यामुळे की काय आज त्यांच्यावर कौंतुकांचा वर्षाव होत आहे.मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या मोथा उपकेंद्रातील आलाडोह गावातील निर्मला भाकरे ही महिला सिकलसेल आजाराने पीडित होती त्यातच ती गर्भवती राहिली त्यामुळे डॉक्टर महिलेवर लक्ष ठेऊन होते वेळोवेळी तिलाा औषधउपचार दिला सोबतच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली मात्र अचानक प्रकृती बिघडली डॉ नागले यांनी सर्वप्रथम परतवाडा येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ लामखेडे यांच्याकडे दाखल केले त्यांनी औषध उपचार केला मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक होत असल्याचे लक्षात येताच अमरावती घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र त्या महिलेचा पती अमरावती येथे जाण्यास तयार नव्हता त्यामुळे तो सरळ पत्नीला घेऊन कठोरा येथे घेऊन गेला यादरम्यान डॉ नीता नागले यांनी त्या महिलेच्या पतीला समजावून सांगितले  त्यांनतर सलोना आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ त्या महिलेला अचलपुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथील डॉक्टरांकडून अमरावतीला जाण्याचा सल्ला दिला त्यांनतर त्या महिलेला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यांनतर डफरिन मध्ये दाखल केले पण येथील डॉक्टरांनी सुद्धा नागपूर जाण्याचा सल्ला दिला पण त्या महिलेचा पती नागपूर जाण्यास तयार नव्हता अखेर जिल्हाशल्यचिकिसक यांनी संपूर्ण खर्चाची तयारी दर्शविल्याने पीडियमसी मध्ये भर्ती करण्यात आले पीडियमसी च्या डॉक्टरांनी आपले कौशल्य पणाला लावत त्या अति जोखमीच्या सिकलसेल गर्भवती मातेमध्ये प्राण फुंकले त्याचा परिणाम म्हणून ता ९ जून रोजी सुखरूप प्रसुती केली आज ती महिला आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत मेळघाटातील जोखमीच्या माता व बाळाला जीवनदान देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पीडियमसीचे डॉक्टर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद नरवने,सलोना केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आदित्य पाटील,मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता नागले यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे

Previous Post Next Post