मा. आमदार केवलराम काळे यांनी जाणून घेतल्या खडीमल गावातील नागरिकांची समस्या...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील खडिमल येथील नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने माजी आमदार केवलराम काळे यांनी चिखलदरा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधुन टॅंकरची मागणी केली होती परंतु दैनंदिन गरजा पाहता पाणी पुरवठा कमी पडत असल्याने मुंबई येथे राज्याचे आदिवासी मंत्री के.सी.पाडवी साहेब यांच्याशी केवलराम काळे यांनी चर्चा करुन त्यांना गावांबद्दल समस्या सांगितले असता त्यांनी जिल्हाधिकारी अमरावती व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना गावात पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले तसेच गावाला दोन नवीन सार्वजनिक विहिरीची सुद्धा मंजुरी मिळाली केवलराम काळे आज गावातील नागरिकांना भेटुन त्यांच्या इतर समस्या जानुन घेतल्या यावेळी सरपंच तुलसी कास्देकर, संजय धिक्कार, तानु धिक्कार, मोतीलाल, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरीक उपस्थित होते.

Previous Post Next Post