मोथा येथिल 19 वर्षिय युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपविले जीवन


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा तालुक्यातील असलेल्या मोथा गावातील युवक राम चंदर शिंगाडे वय १९ वर्ष रा मोथा या तरुण युवकाणे आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली राम याला  मोठा भाऊ असून वडील शेती काम करतात मागिल वर्षी दिवसाढवळ्या चिखलदरा येथील भीमकुंड या खोल दरीत रामच्या बहिणीने आत्महत्या केली होती त्या मध्ये त्याच्या जवाई व बहिणीचा मृत्यू झाला होता मोथा गावात कोणत्या ना कोणत्या कारणावरून आत्महत्येचे सत्र सुरू आहे.यापूर्वीसुद्धा नैसर्गिक आपत्ती वीज पडून एका शेतकऱ्यांच्या शेतात मृत्यू झाला होता चिखलदरा मोथा गावात असे दुर्दैवी प्रकार का घडत आहेत.हा चर्चेचा विषय ठरत आहे.  राम चंदर निखाडे सुस्वभावी होता आपल्या वडीला कडे काही तरी वस्तू जिद्द विकत घेण्यासाठी हट्ट करत होता अशी माहिती पुढे आली राम निखाडे यांनी टोकाचे पाऊल उचलून शेजारी शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याने सर्वाकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती चिखलदरा पोलीस स्टेशनला देण्यात आली असून ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे अमलदार पुढील तपास करत असून चिखलदरा येथे रामचे पोस्टमार्टम करण्यात आले राम ने आत्महत्या का केली याचा तपास ठाणेदार राहुल घटनास्थळावर चिखलदरा तालुका प्रमुख शिवसेना व मोथा येथील उपसरपंच श्री साधुराम पाटील हे पोचले होते त्यांनी या कुटुंबाची सांत्वना केली आहे. चिखलदरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री वाढवे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Previous Post Next Post