मडाखेड येथे पशु वैद्यकीय लसीकरण शिबिर संपन्न:..


 जळगांव जा. प्रतिनिधी:-

 स्व. वीर. गणपतराव इंगळे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील  विद्यार्थीनी  तालुक्यातील मडाखेड या गावात पशु वैद्यकीय लासिकरना बद्दल शिबीर आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती गावचे माननीय सरपंच राजेश सित्रे (मडाखेड खुर्द) आणि माननीय सरपंच विजय कड (मडाखेड बु ) व गावातील प्रतिष्ठित नागरीक शिबिर करीता उपस्थित होते. या शिबिराचे उदघाटन माननीय श्री सरपंच साहेब यांच्या  हस्ते केले. या शिबिरात पशूंना  पावसाळ्यात होणारा आजार उदा. घटसर्प, फऱ्या व इतर रोगांचे निदान करून लसीकरण करण्यात आले. सदर शिबिरात ऐकून 200 जनावरांवर औषध उपचार व लसिकरण करण्यात आले. तसेच जनावरांना होणाऱ्या विविध आजारांवर उपाय सुचविण्यात आले. पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी माहिती पशु पालकांना देण्यात आली. त्या वेळी पशु वैद्यकिय दवाखाण्यातील डॉ. सुनिल गव्हांदे सर व त्यांचे सहकारी श्री ऋषिकेश गावंडे तसेच कृषी विज्ञान केंद्र चे डॉ जाणोतकर सर सुद्धा उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कॉलेज चे प्राचार्य  योगेश गवई, उपप्राचार्य एस. एस. धर्माळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. पी. एस. वानखडे, विषयतज्ञ प्रा. महेश आखुड, विस्तार शिक्षण विषयतज्ञ जे. आर. साळी, आदी यांच्या मार्गदर्शनाखाली  उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाची तसेच पशु लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाची गटप्रमुख किरण बावणे व भाग्यश्री बुंदे व इतर कृषीकन्या पुनम डवले, कोमल आडे, भक्ती भड,  धनश्री बोरसे, प्रतीक्षा चांदणे, तन्वी चव्हाण, शुभांगी गोटारकर कांचन निर्मल, शिवानी ढाकने, मयुरी वानखडे, कांचन बोले,हर्षाली या कृषिकन्याचा सहभाग होता.

Previous Post Next Post