जळगाव जामोद तालुक्यातील निंबोरा बुद्रुक येथे दिनांक 23 जून रोजी दुपारी वीज पडून 25 वर्षीय सागर नामदेव दिगडे या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सविस्तर असे की सागर दिगडे हा तरुण सकाळी शेतीच्या कामानिमित्त सादिक नामक शेतकऱ्याच्या येथे कामाला गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला असता काम करीत असणाऱ्या सागर दिगडे या तरुणाच्या अंगावर वीज पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. सदर मृतक सागर दिगडे त्याच्या पश्चात आई पत्नी व मुलगा असा आप्त परिवार आहे.मृतक सागर दिगडे याला ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टर वेरूळकार यांच्यातर्फे सुरक्षारक्षक वैभव वाघमारे यांनी जळगाव जामोद पोस्टेला फिर्याद दिली असता पोलिसांनी मर्ग दाखल करून घेतला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उंबरहंडे हे करीत आहेत.
निंभोरा बुद्रुक येथील 25 वर्षीय सागर नामदेव दिगडे या तरुणाचा वीज पडून मृत्यू...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
