जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या पिंपळगाव काळे ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक २३/६/२०२२ गुरुवार रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये प्रितीताई गोपाल तायडे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा महिलाराज प्रस्थापित झाले आहे.पिंपळगाव काळेच्या सरपंच पदी महिलाच असून उपसरपंच पदाचा मान सुद्धा पुन्हा एकदा महिलेलाच मिळाला आहे. ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांनी गाव पातळीवर युतीचा निर्णय घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून बहुमत प्राप्त केले आहे.
या अगोदर सरपंच पदी असलेल्या आशाताई सुनिल कळसकार यांनी मोह न करता पहिल्यांदा असे घडले की पिंपळगाव काळे ग्रामपंचायत मध्ये ठरवल्याप्रमाणे कधी झालेले नाही व सरपंचानी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे पण पद सोडलेले नाही पण आशाताई सुनिल कळसकार यांनी प्रकाश पाटील व काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा मान व आदर आदेश राखत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर गुरुवार रोजी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. गाव पातळीवर राजकारण न करता विकासाच्या दृष्टीने सदर निवडणूक यशस्वीपणे पार पडली आणि काँग्रेस पक्षाच्या प्रीतीताई गोपाल तायडे यांची सरपंच पदी अविरोध निवड करण्यात आली. गावाचा विकास आणि ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच्या प्रितीताई गोपाल तायडे यांनी सांगितले. तसेच निवड प्रक्रिया संपल्यानंतर गावातून ढोल व ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी. प्रकाश पाटील.ग्रामसेवक ढगे साहेब.नवनिर्वाचित सरपंच प्रितीताई गोपाल तायडे. उपसरपंच भारतीताई महेंद्र बांगर.माजी सरपंच आशाताई सुनील कळस्कार.माजि उपसरपंच यशोदाताई घटे. ग्रामपंचायत सदस्य. उषाताई चौखंडे. वंदनाताई निकम. दुर्गाताई मांडोकार. राधिकाताई राऊत. अर्चनाताई हरमकार. अजय ताठे. सचिन जाधव. नवलसिंग मावळे. शेख हारूण अतार. नवल गोतरकर. अशोक ढोले.विनोद बहादरे. विलास मांडोकार.सर्व सदस्यांची उपस्थिती होती. तसेच.संतोष गवई वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष जळगाव जामोद.श्रीकृष्ण गवई वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष जळगाव जामोद. विनोद गवई. हरिदास वाघमारे सर्कल प्रमुख. सुधाकर घटे ग्राम शाखा अध्यक्ष. किशोर घटे. सुनील कळसकार. गोपाल तायडे. गजानन तायडे. भागवत तायडे. सुपडा पाटील. युनुस अतार. शालिकराम भोपळे. महादेव घुटे.प्रमोद घुटे. प्रशांत राजपूत. उमेश माडोकार. योगेश जाधव. मयूर राऊत. बालू निकम. सुरेश चोखंडे. सुपडा बांगर.तसेच सर्व काँग्रेस वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

