संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-
दिनांक २३ जून रोजी दुपारच्या वेळी विजांच्या गडगडाटासह संग्रामपूर तालुक्यासह पळशी झाशी शिवारात जोरदार पावसाला सुरवात झाली.भर पावसात पळशी झाशी शिवारातील शुभम हेलगे यांच्या शेतात क्रेनद्वारा विहिरीचे खोदकाम सुरु होते.पाऊस सुरु असतांनाच अचानकपणे वीज पडून विहिरीवर क्रेनद्वारा खोदकाम करत असलेले संजय उत्तम मारोडे वय ५५ वर्ष तर रवी संजय भालतडक वय ३५ वर्ष यांचे अंगावर विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला...२३ जून ला दुपारच्या वेळी विज पडून यात दोघांचा मृत्यू झाला असून तीथेच काम करणारे मंगेश मनोहर बाखरे व बंडू मधूकर मारोडे यांनी आपले कपडे पावसाने भिजतील या कारणाने ते थोडे अंतरावर एका आडोशाला गेले त्यामुळे ते सुद्धा जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून ते यामधून बचावले.जखमी झालेल्या दोघांनाही गावातील लोकांनी संग्रामपूर येथे उपचारासाठी दाखल केले मात्र तेथून त्यांना रूग्णवाहिकेव्दारे शेगावला रवाना करण्यात आले. संजय उत्तम मारोडे हे अल्पभूधारक असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, २ मुली आहेत. रवि संजय भालतडक यांच्यामागे १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
