ग्राम खेर्डा येथे पशू लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न...


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

स्थानिक ग्राम खेर्डा येथे पशू लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .खेर्डा (बु.) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला . या शिबिरात जवळपास १०० च्या वर लसी देण्यात आल्या. या पावसाळ्यापूर्वी लसीकरणाला शेतकऱ्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये विविध रोगाचे निदान करून लसी देण्यात आल्या व त्यांचा बद्दल माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नागेश परिहार उपस्थित होते . त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री. ताठे सर, श्री. म्हसाळ , श्री. सोनोने , श्री . डोबे, श्री. गायकवाड , श्री. व्यवहारे सर  मिळून कार्यक्रम संपन्न केला. श्री. नरेश वानखेडे (सरपंच खेर्डा बू.) व श्री. गोपाल उमरकर (सरपंच खेर्डा खु.) यांचे सुध्दा कार्यक्रमाला सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालयाच्या कृषि कन्या यांनी केले होते.या कार्यक्रमाला प्राचार्य योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे, कार्यक्रम समन्वयक प्रा. विद्या कपले व विषयतज्ञ प्रा. महेश आखूड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .या वेळी गट प्रमुख वैष्णवी पाटकर आणि कोमल निवाणे व इतर कृषि कन्या योगिता मिसाळ, पूजा व॑डाळे , नयना निमकरडे, वैष्णवी लाडके, प्राची मडावी, वैष्णवी कीर्तने स्नेहल राजपूत यांनी सहभाग दर्शवला.
Previous Post Next Post