ग्राम खेर्डा येथे भव्य पशू लसीकरण शिबिर संपन्न...


जळगाव जा.प्रतिनिधी:-

तालुक्यातील ग्राम खेर्डा येथे भव्य पशु लसीकरण शिबिर संपन्न झाले. स्वा.वीर. गणपतराव इंगळे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या कृषिकन्यांनी खेर्डा गावात पशु लसीकरण आयोजित केले. सरपंच श्री. नरेश वानखडे (खेर्डा बु.) आणि श्री. गोपाल उमरकर (खर्डा खु) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले .या शिबिरात घटसर्प,फऱ्या इतर रोगांचे निदान करून लसी देण्यात आल्या. विविध आजारांवर उपाय सुचवण्यात आले. पावसाळ्यात जनावरांच्या विविध आजाराविषयाची माहिती पशु पालकांना देण्यात आली. यावेळी पशुवैद्यकीय दवाखानातील डाॅ.नागेश परीहार सर  व त्यांचे सहकारी श्री.ताठे,श्री.सोनोने श्री.म्हसाळ,श्री.डोबे,श्री.व्यवहारे,श्री.गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य प्रा.योगेश गवई,  उपप्राचार्य एस.एस.धर्माळ,कार्यक्रम समन्वयक प्रा.पी.एस. वानखडे, विषयतज्ञ प्रा. महेश आखुड ,विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ जे. आर. साळी,आदी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम तसेच पशु लसीकरण  कार्यक्रम आयोजित कण्यात आले. यावेळी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाची गटप्रमुख प्रिती पुरी व अनिशा मनतकार ,व इतर कृषि कन्या शिवानी नवलकार , निकीता पिसे , अनामिका रजाने , प्रतिक्षा रौंदळे, प्रियंका मालठाणे ,प्राजक्ता खिरोडकर , दक्षता जुंबाळे ,शिवानी किंनाके , नेहा म्हासाये . या कृषिकन्यांचा सहभाग आहे.

Previous Post Next Post