जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक 14 जून रोजी जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्र व पशु वैद्यकीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कृषी महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुनगाव येथे पशु रोग निदान व लसीकरण शिबिर घेण्यात आले. सदर शिबिर कार्यक्रम उद्घाटनाप्रसंगी गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, पत्रकार अनिल भगत, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद चे शास्त्रज्ञ डॉक्टर विनोद जाणकर डॉक्टर धनंजय मोरे पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, डॉक्टर संजय गवई इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील विद्यार्थिनी कुमारी आश्विनी शिंगणे हिने केले. यासह कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर विनोद जानोतकर यांनी सुनगाव येथील पशुपालकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांवर येणारे विविध प्रकारचे रोग त्यांची लक्षणे व औषध उपचार यासह या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लसीकरण हा योग्य पर्याय याबाबत त्यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले तसेच पावसाळ्यात जनावरांना कोणती आजार होऊ नये म्हणून जनावरांची घ्यावयाची काळजी याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. सदर या शिबिर कार्यक्रमात वंध्यत्व तपासणी गोचीड निर्मूलन गर्भ तपासणी कृत्रिम रेतन व विविध आजारांचे निदान करून औषधोपचार केले. तसेच घटसर्प एकटांग्या या रोगाचे जनावरांना लसीकरण करण्यात आले सदर शिबिरामध्ये एकूण 303 जनावरांवर औषधोपचार करून लसीकरण करण्यात आले. या शिबिरामध्ये पशु सेवक डॉ. गजानन माटे,डॉ. संजय गवई, डॉ.राहुल वाघ,डॉ.रमेश काळपांडे,डॉ. वाकर,डॉ.आकुड यांच्यासह स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम सत्रातील विद्यार्थिनी कुमारी रूपाली राऊत रोहिणी रेठेकर, चैताली सिरसाट, सुविधा सिरसाट, शेख अफसाना यांच्यासह सुनगाव येथील पशुपालकांचे सहकार्य हे शिबिर यशस्वी होण्याकरिता लाभले.
सुनगाव येथे पशुरोग निदान व लसीकरण कार्यक्रम संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
