जळगाव जामोद येथे भाजपच्या वतीने करण्यात आला राज्यसभा निवडणूक विजयाचा जल्लोष...


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळुन त्यांचा विजय झाला.राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल,डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक या  तीनही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला.विजयी उमेदवारांचा जळगाव जामोद विधानसभेचे आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद तालुका भाजपाच्या वतीने मोटर सायकल रॅली व फटाके फोडुन स्थानिक दुर्गा चौक येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत कपले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष उमेश येउल,रविंद्र ढोकणे,अनिल जयस्वाल, भागवत अढाव,राजु हिस्सल,राजेंद्र उमाळे,रमेश गवई माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश अंबडकार, सुनगांव सरपंच रामेश्वर अंबडकार, बळीराम धुळे, उमेश कुरवाडे,विजय वंडाळे,संतोष वंडाळे, अमोल भगत,कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, रमेश कोथळकार, यांच्यासह बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या विजयी जल्लोष मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Previous Post Next Post