तेल्हारा तालुक्यातील रस्त्या बाबत बैठक संपन्न...


 तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु

दिनांक 8 जून रोजी मुंबई येथे झालेल्या तेल्हारा तालुक्यातील रस्त्याबाबत च्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थे बाबतीत तालुक्यातील अनेक संघटना, पक्ष, एवढेच नव्हे तर संपूर्ण जनता सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलने केली , बंद पुकारले एवढेच काय तर चक्क आमदार सुद्धा धरण्यावर बसले मात्र रस्त्याची स्थिती मात्र सुधारली नाही आणि रस्त्याचे कामाला सुरुवात ही झाली नाही. मात्र आज प्रहार जण शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे समवेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत ह्या प्रश्नाला कुठेतरी पूर्णविराम मिळण्याचे चित्र दिसत आहे.आज दुपारी 4 वाजता प्रहार जण शक्ती पक्षाचे अनिल गावंडे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसातच बेलखेड ते तेल्हारा रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून इतर कामाचा पहिला टप्पा जुलै मध्ये पूर्ण होऊन दिवाळी पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post Next Post