माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील दिल्ली पोलिसांकडून अटक; राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली..


मंगल काकडे/जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी..

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना ईडीनी नोटीस बजावली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांनाही दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आले. प्रकाश पाटील हे राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर दिल्ली येथे त्यांच्या समर्थनार्थ गेले होते. तेथे त्यांनी काँग्रेस करत असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. दिल्ली पोलिसांनी कार्यकर्त्यांचा वाढता आक्रोश बघता त्यांना स्थानबद्ध करण्याचे पाऊल उचलले. राहुल गांधी यांना राजकीय आकसबुद्धीने आज तिसऱ्या दिवशी ईडीची नोटीस बजावल्याबद्दल ए.आय. सी.सी. कार्यालयाकडे राहुल गांधी यांना भेटण्यासाठी जात असताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील व अखिल भारतीय काँग्रेसचे ओबीसी चे नेते तथा माजी मंत्री कॅप्टन अजय यादव यांना सुद्धा दिल्ली पोलिसांनी अटक करून पोलीस ठाण्यात स्थानबद्द करण्यात आले आहे.

Previous Post Next Post