दिनांक 12 जुन, 2022 रोजी मेळघाट पदवीधर संघाची बैठक ग्राम बारू मध्ये घेण्यात आली. या बैठकीत आगामी पदवीधर चुनावाची रणभूमी तैयार करण्यात आली. सदर कार्यक्रमात मेळघाट पदवीधर मतदार संघाचे प्रमुख मा. माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर तसेच मेळघाट पदवीधर मतदार संघाचे विस्तारक मा. श्री. साबुलालजी दहिकर, मा. ता. अध्यक्ष सदाशिवजी खडके, मा. महिला जिला अध्यक्ष क्षमाताई चौकसे, माजी आयुक्त श्री. रमेशजी मावस्कर, लक्ष्मणजी जांबेकर, प्रकाशजी, श्री. मारोतीजी गायन, श्री. सुनिलजी लखपती, श्री. तिलकजी पटेल, राजुजी बांगरे, भाजपा प्रवक्ता श्री. सुधाकरजी फकडे, रत्नापूर सरपंच श्री. गुलाबभाई, धारणी शहर अध्यक्ष श्री. सुशिलजी गुप्ता, भाजपाचे वरिष्ठ नेता श्री. नालमवार काका, व समस्त गावकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संचालन भाजपा तालुका सचिव सुंदर पोटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका सचिव मनिषकुमार पांडेय यांनी केले.
मेळघाटात पदवीधर मतदार संघाची समन्वय बैठक...
धारणी तालुका प्रतींनिधी : सुंदर पोटेकर,
