मेळघाट मधून जाणारी पूर्णा खंडवा रेल्वे आता हिवरखेड मार्गे..वन्यजीवांसाठी घेतला निर्णय...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाटमधुन स्वतंत्र पूर्व काळापासून सुरू असलेली पूर्णा खंडवा रेल्वे आता कधीच मेळघाटमधून धावणार नसल्याचे वृत्त एकूण मेलघाटवासी निराश झाले आहेत.गेल्या पाच वर्षापासून  ब्राडगेजचे  काम रखडले होते . मात्र नुकत्याच झालेल्या केंद्राच्या वेस्टर्न झोन कौन्सिल च्या  बैठकीत वैकल्पिक संग्रामपूर तालुक्यातून  नवीन लाईन टाकणार असल्याने एकदा पुन्हा पर्यावरण वाद्याकडून मेळघाटवासियांवर अन्याय झाला आहे.या रेल्वे मार्गाने मेळघाट मधील ४० गावे जगाच्या संपर्कातून तुटणार आहेत.मेलघटमधील हजारों युवक शिक्षणासाठी व कामाच्या शोधात मुंबई, इंदौर , पुणे, दिल्ली पर्यंत या रेल्वेने जात होते, तसेच इतरही बाबतीत  जसे व्यावसायिक दृष्टीने सदर रेल्वे फायदेशीर होती.या रेल्वेने ओंकारेश्वर शेगाव इंदौर अकोट अकोला जाणे सहज शक्य होते. व येणाऱ्यासही हा मार्ग योग्य होता.मेळघाट मधूनच ब्राडगेज व्हावे यासाठी आमदार राजकुमार पटेल, खासदार नवनीत राणा , भाजपचे प्रा. दिनेश सूर्यवंशी,भाजपा जिल्हाध्यक्ष सौ. निवेदिता चौधरी, अप्पा पाटिल, माजी जि. प. सदस्य श्रीपाल पाल, धुळघाटचे सरपंच राम भिलावेकर यांनी तक्रारी पत्रत्रव्यव्हार व निदर्शने केली. तरीसुद्धा या सर्व लोकप्रिनिधींच्या मागणी ल केराची टोपली दाखवत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत  झालेल्या वेस्टर्न झोन कौन्सिल च्या बैठकीत महाराष्ट्र शासनाचे केलेल्या हरकती नुसार नवीन मार्गाला मंजुरी दिली. अकोट वण धुळघट डाबका ऐवजी आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरुन म्हणजेच हीवरखेड (रूपराव )सोनाला जामोद, व्हाया खकानार तुकईथड या नवीन मार्गाने ब्राडगेज लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी एक कायदेशीर लढा पण देण्यात आला होता.विस्तारीकरण मेळघाट बाहेरुन घेतल्यास वाघ अथवा इतर दुर्मिळ व संकट ग्रस्त वन्य जीवांचे रक्षण होईल.  असे सांगण्यात आलेले होते.पर्यावरण प्रेमी कडून ऍड.मनीष जेसवानी यांनी समर्थपणे बाजू मांडून जामोदमार्गे ब्राडगे ज विस्तारीकरण करण्याची मागणी करण्यात आलेली होती. याशिवाय मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी हि मेळघाटच्या गाभा क्षेत्रातून ब्राडगेज विस्तारीकरणासाठी  विरोध दर्शविला होता.या सर्व बाबी विचारात घेऊन केंद्रीय समितीने सदर रेल्वे मेळघाट बाहेरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous Post Next Post