चौराकुंड गावातील नागरिकांचे उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांना निवेदन...


धारणी तालुका प्रतिनिधी/ सुंदर पोटेकर 

धारणी तालुक्यातील चौराकुंड गावातील नागरिकांचे  दिनांक 17 जून शुक्रवार रोजी उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांना  विविध समस्यांना घेऊन आणि चौराकुंड गावातील बोगस कामाची चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहेत.. सविस्तर माहिती अशी की चौराकुंड गावातील  मागील चार महिन्यापासून पाणीपुरवठा बंद आहे आणि ग्रामसचिव व सरपंच आणि उपसरपंच यांना मनमानी नुसार गावातील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करत असून ग्रामपंचायत मधील गावातील गुरांचा शासकीय कोंडवाडा व पाण्याचे धर्माला यांच्या गैरउपयोग गावातील विश्वास मारुती खडके यांनी कोंडवाड्यावर अतिक्रमण करून पाण्याचा धर्माला तोडून ग्रामपंचायत च्या जागेवर घराचे बांधकाम केले .सोबतच जल जीवन मिशन अंतर्गत मौजा चौराकुंड गावातील जुने विहीर हे चांगल्या दर्जाचे असताना त्याला नष्ट करून त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे विहिरीचे बांधकाम केले आहे.इतकेच नाही तर गावातील नागरिक ग्रामसभेत ग्रामपंचायतचे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन निघुन जातात .पंचायत समिती कार्यालय मार्फत दिलेल्या सूचना व पत्रानुसार कोणती कामे केली जात नसून ग्रामसचिव व सरपंच आणि उपसरपंच यांच्या मिलीभगत मुळे गावातील संपूर्ण विकास अंधारात गेला असून   अति विकट समस्येमुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामसेवक हा कार्यालयात नेहमी गैरहजर राहत असून ग्रामपंचायतीचे शासकीय कामे धारणी येथे आपल्या घरून बसून करता आहेत गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये कोणतेही काम असता धारणी ला यावे लागते त्या करिता दिनांक 17 जून शुक्रवार रोजी गावातील असंख्य नागरिकांनी मिळून उपविभागीय अधिकारी सावंत कुमार यांना निवेदनाद्वारे चौकशी करण्याचे विनंती केली..

Previous Post Next Post