धारणी ता. प्रतिनिधी सुंदर पोटेकर ,
दिनांक सतरा जून रोजी एस एस सी बोर्डाचा निकाल लागला असून , यातच धारणी येथील "कस्तुरबा गांधी विद्यालय" येथे शिकत असलेल्या गरीब शेतकरी श्री अर्जुन पोटेकर, गाव अंबाडी ,यांचे सुपुत्र उज्वल पोटेकर, यांनी दहाव्या वर्गात परिश्रम करून प्रत्येक विषयात प्रावीण्य अंक मिळवून 90.40% टक्के गुण प्राप्त केले। यांचे श्रेय त्यांनी कस्तुरबा गांधी विद्यालय, धारणी येथील मुख्याध्यापक श्री दिनेश सिंह ठाकूर, व वर्गशिक्षक श्री विलासराव मेहरे, सर व शाळेच्या सर्व वर्ग शिक्षकांना आणि आपल्या आई-वडिलांना दिले। उज्वल, यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केल्याबद्दल श्री चेतन जवरे, श्री बालमुकूंद यादव, व इतर मित्रांनी त्यांचे कौतुक करू स्वागत केले.
