ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे भव्य महिला मेळावा संपन्न...


 तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु

तेल्हारा ग्रामीण रुग्णालय तेल्हारा जि. अकोला येथे दि 2/6 /2022 रोजी अकोला जिल्हा पालकमंत्री मा ना ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून भव्य महिला आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरामध्ये 873 महिलांची नोंदणी करून 951 आजाराकरिता तपासणी व चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये पन्नास मोठ्या शस्त्रक्रिया व सत्तावीस लहान शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहेत व मुंबई करता संदर्भ सेवा जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे तज्ञांच्या तपासणी नुसार निश्चित होईल तसेच 91 रुग्ण पुढील उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे संदर्भित करण्यात आले कोविड लसीकरणा मध्ये आज 66 लाभार्थ्यांनी Covidची लस घेतली.सदर शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. सदर शिबिरास जिल्हा शल्य चिकित्सक अकोला डॉ तरंगतुषार वारे मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले , नोडल अधिकारी डॉक्टर मॅडम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ धनंजय चिमणकर डॉ मनिष शर्मा (RCHO) माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक तापडियासर, वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पेंदामसर, डॉक्टर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी ,विशाल गव्हाळे, जिल्हा लसीकरण पर्यवेक्षक , सर्व RBSK वैद्यकीय अधिकारी डॉ राहूल सदाफळे ,डॉ संदीप इंगळे, डॉ अंजली राहुल सदाफळे, डॉ अपूर्वा पुजारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथून आलेले सर्व तज्ञ मंडळी यांनी मोफत सेवा दिली.सदर शिबिरात प्रहार संघटने तर्फे विकी मल्ल यांच्यातर्फे महिला रुग्णांना नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालय तेल्हारा तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका, परिचर, आशा सेविका, गट प्रवर्तक, आशा वर्कर, वाहनचालक इत्यादींनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी करण्या करीता सहकार्य केले.

Previous Post Next Post