प्रशांत भोपळे/हिवरखेड...
हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या प्रसिद्ध वारी भैरवगड परिसरातील बुलडाणा आकोला जिल्ह्यातील सीमा मार्गावर वाहणाऱ्या पाणी परिसरात दिनांक २६ च्या दुपारी एका तरुणाचा बुडून मुत्यू झाल्याची खडबळ जनक घटना घडली त्या युवकाला बाहेर काढून तेथील तरुणांनी त्यांच्या पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला होता ,परंतु सदर युवक काही हालचाल करत नसल्याचे समजून आले,याबाबत हिवरखेड पोलिसांना कळवण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती,सदर युवक शेगाव येथील ईदगाह परिसरातील असून त्याचे नाव इकबाल शाह असल्याची ओळख पटली याबत पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत, तसेच या परिसरात असलेला मामा भाच्याचा डोह बुजवण्यात यावा अशी सुद्धा मागणी पर्यटक करीत आहेत
