आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज..दानापुर आरोग्य केंद्रात मनमानी कारभार..साथीच्या आजारांनी नागरिक हैराण..मेडिकल ऑफिसर गैरहजर..कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना उद्धटपणाची वागणूक.आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य...


 तेल्हारा प्रतिनिधी संघपाल गवारगुरु

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तेल्हारा तालुक्यातील दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे चित्र आरोग्य केंद्राअतंर्गत कोलमडलेल्या आरोग्य सेवेवरुन दिसून येते केंद्रांतर्गत येत असलेल्या ग्राम रायखेड येथे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी थैमान घातले असून हिवताप हगवण डोकं दुखी हातपाय दुखणे उलट्या होणे ताप येणे या प्रकारचे अनेक रुग्ण साथीच्या विविध आजारांनी ग्रासले आहेत परंतु संबंधित दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचा एकही कर्मचाऱ्याने येथे फिरकून पाहिले नसल्याने उपचाराअभावी आजार ग्रस्त नागरिक जागेवरच उपचारासाठी तडफडत आहेत तसेच गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मौजे कोठा येथे सुध्दा अनेक नागरिकांना पोटदुखीचा भयानक त्रास होत आहे तर या समस्येची तक्रार येथील नागरिकांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे आधीच केली आहे परंतु तक्रार करुण काही फायदा झाला नाही कारण मुजोर आरोग्य यंत्रणेने याची दखल घेतली नाही म्हणून कोठा गावातील परिस्थिती जैसे थे कायम आहे याचप्रमाणे याच आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या ग्राम चांगलवाडी येथील रुग्ण दानापुरला प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता त्यांना केंद्रात आरोग्य सेवक सेविका अथवा कर्मचारी हजर दिसले नाही म्हणून रुग्ण हे कर्मचारी निवास रुमवर बोलावण्यास गेले असता त्यांना कर्मचाऱ्यांनी दमदाटी केली आणि खूप वेळा नंतर आल्यावर रुग्णांना उद्धटपणाची वागणूक दिली असे रुग्णाने सांगितले विशेष म्हणजे दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा नित्याचाच कार्यक्रम झाला असून या आधी सुध्दा असे प्रकार अनेक वेळा झाले की रुग्ण आरोग्य केंद्रात गेले व त्यांना औषध गोळ्या न देता फक्त बोळवण करुन उपचार न करता वापस पाठविल्या गेले एखाद्या सुसक्षित रुग्णाने आरोग्य सेवेविषयी म्हटल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली या सर्व घटना क्रमावरुन समजते की दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे

मी दि. २५ जून रोजी उपचार करून घेण्याकरिता दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता तिथे कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी कोणी डियुटीवर हजर नव्हते आरोग्य केंद्रात रस्त्यावर पाणी सोडले होते तसेच घाण कचरा पडलेला होता

अंकुश शिवणकर , रुग्ण चांगलवाडी 

गेल्या काही दिवसांपासून गावात साथीचे विविध आजार उद्भवले असून अनेक नागरिक आजारी पडले आहेत परंतु संबंधित दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्राकडुन उपचार सुविधा मिळाली नाही

संतोष तायडे , सदस्य ग्रा.पं रायखेड

दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी अनेक वेळा गैरहजर राहतात परिणामी नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागते विशेषतः आरोग्य सेवा मनमानी पद्धतीने देत असल्याचे बर्याच वेळा दिसून आले जरी अनुशेष असला म्हणून लोकांना वेठीस धरणे योग्य नाही तरी याबाबत संबंधित वरिष्ठांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे

Previous Post Next Post