अकोट तालुका अंतर्गत ग्रामपंचायत शाहापूर या ग्रामपंचायतील सदस्या सुनंदा तुलसीदास भास्कर यांचे पुतणे सुदेश सुभाष भास्कर व सुमित सुभाष भास्कर यांच्या कडून शाहापूर येथिल शेषराव पवार व त्यांच्या नातेवाईकाला दिली जिवे मारण्याची धमकी. प्राप्त माहितीनुसार :- शाहापूर गावात सहकार जागा असुन अशा जागेवर कोणीही ताबा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच शाहापूर येथिल शेषराव पवार यांच्या घरा मागे सहकारी रस्ता असुन या सहकारी रस्त्यावर गावातील नागरीकांचा येजा असुन तसेच पवार यांचे गुरे सोडण्यासाठी दुसरा रस्ता नसून हा एकच एकमेव रस्ता आहे. परंतु पवार यांच्या घराच्या बाजूला असणारे सुदेश भास्कर व सुमित सुभाष भास्कर ही मंडळी दादागिरी करून या सहकारी रस्तावर अतिक्रमण करीत आहे.तसेच या रस्त्या बाबतीत शेषराव पवार यांनी ग्रामपंचायत शाहापूर व तहसील महसूल विभाग अकोट येथे तक्रार काही दिवसा पुर्वी दिली असुन आता पर्यंत या तक्रारी कडे महसूल विभागा व ग्रामपंचायत सरपंच व सचिव दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.सुदेश भास्कर व सुमित भास्कर यांना या रस्त्यावर अतिक्रमण करु नये असे शेषराव पवार यांनी या मंडळींला म्हटले असता तर तुझ्या कडून काय होते ते करून दाखव माझी काकू ग्रामपंचायत सदस्या आहे. तु जास्तीचा बोलेल तर तुला पाहून घेवू अशी जिवे मारण्याची धमकी या मंडळी कडून देण्यात आली आहे. कधि माझ्या जिवाचे व माझ्या कुटूंबातील व्यक्तींचे जिवाचे बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार गैर अर्जदार व ग्रामपंचायत सरपंच व सचिव राहणार आहे. असे म्हणने शेषराव पवार यांचे आहे. तसेच पवार यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पवार यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दि. ३१/६/२०२२ ला गैर अर्जदार विरुद्ध तक्रार दाखल केली असता ३२३,५०४, ५०६ असे भारतीय दंड नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.आता या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण बाबत महसूल विभाग, पोलीस व ग्रामपंचायत काय निर्णय घेणार या कडे गावातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
शाहापूर ग्रामपंचायत येथिल सरपंच सचिवांचा कारभार भोंगळ..अतिक्रमण जागेचा भांडण निपटेना.।ग्रामपंचायत सदस्याच्या नातेवाईक कडून जिवे मारण्याची धमकी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
