जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोट येथे वृक्षारोपण...

 

अकोट ता.प्रतिनिधी/

दिनांक 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोट सामाजिक वनीकरण विभागातर्फे अकोट वन्यजीव विभागाच्या परिसरात वृक्ष लागवड करून संकल्प हाती घेतला आहे.  यानिमित्ताने वनपाल सुधीर हाते  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणाले की, कोरोणा या काळात सगळ्यांना ऑक्सीजन ची किंमत मोजावी लागली. तसेच सध्या जागतिक तापमान याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक नागरिकांनी वृक्षलागवड करून त्याचे संगोपन  करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून अशा कोरोना सारखा महामारीची कोणावरी पाळी येऊ नये. या निमित्त सर्वांनी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.एस. ए. कोकणे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण अकोट यांच्या मार्गदर्शनात सुधीर हाते वनपाल अकोट, अकोट भाग एकचे तलाठी शैलेश मेतकर, शरीफ पटेल, महादेव गोधमळे, सागर नृपनारायण, पत्रकार तथा पर्यावरण मित्र सय्यद अहमद, अक्षय पाटील जायले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post