तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण परिसरात चालू आठवड्यात चार ते पाच वेळा पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपून घेतली असून आतापर्यंत सरासरी ८०% टक्के पेरणी झाली आहे परंतु पेरणी नंतर पाऊसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून पाऊसाची प्रतिक्षा करीत आहे.या वर्षी सुरुवातीलाच म्हणजेच दि. २० जून पासून चार ते पाच वेळा पंचगव्हाण परिसरात समाधानकारक पाऊस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच खरिपातील शेतीची पेरणी करुण घेतली यामध्ये दि. २१ जून पासून काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ने तर काही शेतकऱ्यांनी तिफण द्वारे सोयाबीन तूर उडीद मूग ज्वारी तिळ आदी वानांची पेरणी केली तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी हाताने सुध्दा कपाशीची लागवड केली आहे.यावेळी शेतकऱ्यांनी महागड्या खते बी बियाणे काळया आईच्या कुशीत टाकून हिरवे स्वप्न रंगवणे सुरू केली आहेत परंतु दि. २१ जून ते २५ जून दरम्यान केलेल्या पेरणीवर सतत दोन दिवस पाऊसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पण दि. २५ जून रोजी दुपारी झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.तर अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने २०% टक्के पेरणी होणे बाकी आहे यामध्ये सपशेल शंभर टक्के कोरडवाहू शेतकऱ्यांचा समावेश आहे व ,८०% टक्के पेरणी केलेल्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असल्याने त्यांनी पेरणी केली आणि पाऊस बंद दरम्यान पिकांना सिंचनाव्दारे पाणी देण्याची व्यवस्था केली असून सिंचनाच्या पाण्यापासून फक्त पिक वाचविता येतो कारण पाऊसाच्या पाण्याने जो गुण पिके दाखवितात तो गुण जमिनीतील पाण्याने दिसून येत नाही म्हणून सर्व शेतकरी वर्गाला पाऊसाची प्रतिक्षा लागली आहे
मी दि. २१ जून रोजी बैलांवरील तिफणने पेरणी केली आहे परंतु पाऊस कमी प्रमाणात होत असल्याने चिंता निर्माण झाली आहे की पेरणी यशस्वी होतो की नाही कारण पेरणी फेल झाल्यास आर्थिक संकट सामोरे ठाकत आहे
प्रमोद कापसे , शेतकरी
पंचगव्हाण
यावर्षी जून च्या दुसऱ्याच आठवड्यात चार ते पाच वेळा चांगला पाऊस आल्याने मी दि. २१ जून रोजी ट्रॅक्टरने पेरणी केली आहे परंतु पाऊसाने दांडी मारल्याने पेरणी सक्सेस होईल की नाही अशी समस्या भेडसावत आहे
अजाबराव गवारगुरु , शेतकरी पंचगव्हाण
