टेबुरसोंडा कन्या आश्रमशाळेची उचांचलेला प्रगतीचा आलेख..कोरीनामुळे जग थांबल असल तरी टेबुरसोंडा कन्या आश्रमशाळेची प्रगती मात्र अबाधित...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

चिखलदरा तालुक्यातील कन्या पोष्ट बेसिक आश्रमशाळा टेबुरसोंडा हि मेळघाटातील नव्हे तर अमरावती विभागातील सर्वात जास्त निवासी विद्यार्थी संख्या असलेली शाळा असून सुद्धा शहरा प्रमाणेच सेवासोयी सुविधायुक्त स्वच्छ व प्रसन्न वातावरण चिखलदरा तालुक्यातील टेबुरसोंडा येथिल कन्या आश्रमशाळा ही आहे. कोरोना माहमारीने दोन वर्षांचा प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक निता जाधव यांनी अथक प्रयत्न करून यशाची परंपरा कायम ठेवली पर्यायाचे मार्च 2022 च्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल तर कला शाखेचे निकाल 96 टक्के तसेच दहावीचा 98 टक्के निकाल लागला. त्या मध्ये 12 विचे पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत व 156 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनीनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल अप्पर आयुक्त अमरावती व श्री सावन कुमार प्रकल्प अधिकारी धारणी यांनी विद्यार्थी शिक्षक व मुख्याध्यापक नीता जाधव मॅडम यांचे आभार मानले.तसेच विद्यार्थीनी वेळोवेळी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या बाबत प्रकल्प कार्यालय धारणी शिक्षक मुख्याध्यापक नीता जाधव  अधिक्षेक अधिक्षिका व पालकांना आपले यशाचे श्रेय दिले आहे.

Previous Post Next Post