मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू मातामृत्यू तसेच आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त मेळघाट विधान विधानसभा क्षेत्रातील रिक्त असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ताबडतोब भरण्याची कारवाई करण्या बाबत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे आरोग्य सचिव तसेच अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त यांना पत्राद्वारे निवेदन सादर केले आहे त्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी केली आहे . मेळघाटातील सादराबाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अकरा पदे रिक्त धुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्र तीन पदे रिक्त कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्र दोन पदे रिक्त बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र चार पदे रिक्त हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्र एक पद रिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभूसोडा प्राथमिक आरोग्य केंद्र एक जागा रिक्त सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्र 2 जागा रिक्त हतरू प्राथमिक आरोग्य केंद्र दोन जागा रिक्त काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र दोन जागा रिक्त अशा अनेक जागा सध्या मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असल्याने मेळघाटातील आरोग्य समस्या सोडविताना मेळघाटातील जनतेला अनेक अडचणी येत आहेत तसेच या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने मेळघाटातील आरोग्य यंत्रणेचा सर्व भार मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांच्यावर सोपवून मेळघाटातील जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे मानसेवी वैद्यकिय अधिकारी त्यांच्यावरील जबाबदारी अतिशय इमानेइतबारे पार पाडून अतिशय थोडक्या मानधनावर आपल्या सेवा पुरवीत आहेत पण ज्या इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक मेळघाटात आरोग्य यंत्रणा सुधारण्याच्या हेतूने शासनाद्वारे करण्यात आलेली आहे त्यामधील अनेक वैद्यकीय अधिकारी मे गटामधून अनाधिकृतपणे आपल्या कामावरून गैरहजर आहेत काही वैद्यकीय अधिकारी मेळघाटामध्ये रुजू होऊन काही महिने काम करतात मेळघाटातील अतिदुर्गम भागात लागू असणारे वेतन भत्ते लागू करून घेतात व नंतर शासनाच्या नियमांचा फायदा घेऊन उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता मेळघाटच्या नावावर आपला प्रवेश पुढील वैद्यकीय शिक्षणाकरिता करून घेतात व शिक्षणाकरिता निघून जातात ज्यामुळे कागदोपत्री सदरची पदे भरलेली दिसतात परंतु वस्तुस्थिती मध्ये त्या-त्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असतात व दुर्गम भागाच्या वेतन व त्याचा लाभ आनंदाने उचलत असतात त्याच प्रकारे शासनाने वरिष्ठ अधिकारी सुद्धा मेळघाटातील आरोग्य समस्यांचे पाहणी करण्याच्या नावाने मेळघाटात येतात व शासनाच्या खर्चाने निसर्ग पर्यटन मौज-मजा करतात खाणे-पिणे करून निघून जातात व मेळघाटातील समस्या जैसे थे तशीच भूतकाळा प्रमाणे वर्तमान काळात सुद्धा वाऱ्यावर म्हणजेच रामभरोसे राहते तरी हा प्रकार माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या समस्येकडे लक्ष देऊन तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांनी बैठकीचे आयोजन करून तात्काळ मेळघाटातील आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भwरण्यात साठी कारवाई करावी तसेच मेळघाटातील आरोग्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा अशी मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
मेळघाटातील आरोग्य अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त.मेळघाटातील आरोग्य अधिकाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यात यावी.आमदार राजकुमार पटेल यांचा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
