वापरात नसलेल्या विहिरींचे पाणी पिल्याने बुधवार 6 जुलै पासून मेळघाट भागातील काही गावांमद्धे अतिसार व डायरिया आजाराचा उद्रेक होऊन काही गावांमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजकुमार पटेल यांनी शनिवार 9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कॉल करून घटनेची माहिती घेऊन मृत्यूदुखी पडलेल्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर करीत असल्याचे सांगितले माजी राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनीसुद्धा आजाराने मृत्यूदुखी पडलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत प्रहार पक्षाच्या वतीने जाहीर केल्याची माहिती आ.राजकुमार पटेल यांनी दिली मेळघाट विधान सभा क्षेत्रामधील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाचडोंगरी व कोयलारी गावांमधील नागरिकांनी त्यांच्या गावाच्या पाणीपुरवठा योजनेचे विद्युत पुरवठा बील न भरल्याचे कारणांमुळे त्यांच्या पाणीपुरवठा योजनेची वीच खंडीत करण्यात आली ज्यामुळे पिण्याच्या करीता पाणी उपलब्ध न झाल्याने नाईलाजाने स्थानिक नागरिकांना वापरात नसलेल्या दुषित विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली बुधवार दि.०६/०७/२२ रोजी रात्री पासुन अतिसाराची(डायरीया साथ)लागन पसरली व गुरवारी दि.०७/७०/२२ रोजी सकाळी या अतिसाराच्या साथीने उग्र रूप धारण केले व नागरिक आजारी पडुन अत्यवस्थ होण्यास सुरुवात झाली.पाच डोंगरी व कोयलारी गावांमधील रुग्णांना चुरणी येथील ग्रामीण रुग्णालय आणण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या व रुग्णांना चुरणी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यास सुरुवात झाली.मेळघाट विधान सभा क्षेत्राचे कर्तव्य दक्ष आमदार राजकुमार पटेल यांना सदर घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हा स्तरावरील सर्व अधिका-यांना सदर प्रकाराची माहिती देऊन ताबडतोब उपचार व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आमदार राजकुमार पटेल माजी राज्यमंत्री आमदार बच्चूभाऊ यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास सूचना केल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेळघाट मधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्रहार पक्षाच्या वतीने मृत्यूदुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रहार पक्षाच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शुक्रवार दि.०८/०७/२२ रोजी स्वतः आमदार राजकुमार पटेल अतिसार डायरीयाग्रस्त पाचडोंगरी व कोयलारी गावांमधील नागरिकांच्या भेटीकरीता व सर्व परीस्थिती चा आढावा घेण्यासाठी काटकुंभ ,चुरणी पाचडोंगरी,कोयलारी परीसरात पोहोचले व घडलेल्या सर्व प्रकारची व घटनेची माहिती जाणून घेतली व अतिसार डायरीयाग्रस्त नागरिकांवर योग्य उपचार करण्याचे व अतिसार डायरीयाग्रस्त भागात अजुन लागन पसरु नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. व सर्व प्रकारची मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिकांना दिले.सदर अतिसार डायरीयाग्रस्त लागणीमुळे १) गंगाराम धिकार वय २५ वर्ष २) सविता सहदेव अखंडे वय ३० वर्ष ३)सुखलाल मोती जामुनकर यांचा गुरवारी मृत्यू झाला व शनिवारी सकाळी ४)मंगीया रंगुसा उईके वय ७५ वर्ष या महीलेचा मृत्यू झाला.रविवारी दि.१०/०७/२२ रोजी आमदार राजकुमार पटेल हे पुन्हा काटकुंभ ,चुरणी पाचडोंगर कोयलारी परीसरात पोहोचले व त्यांनी आजारी रुग्णांच्या उपचाराचा व प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व मृतकाचे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने प्रत्येकी १ लक्ष रुपये कुटुंब प्रमाने सानुग्रह अनुदान आर्थिक मदत केली.व आजारी रुग्णांना शक्तीवर्धक कीट चे वितरण करण्यात आले.यावेळी त्यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेश सेमलकर, देविदास कोगे,मोंग्या बेठेकर,सुनिल उईके, कमलेश राठोड,संदिप अलोकार,मनोज बेलकर,कालु अखंडे, सुभाष अमोदे तसेच रोहित राजकुमार पटेल व काटकुंभ चुरणी पाचडोंगरी व कोयलारी गावांमधील व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह्या सानुग्रह अनुदान आर्थिक मदती करीता स्थानिक नागरिकांनी आमदार राजकुमार पटेल व मा.ना.बच्चुभाऊ कडु तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत व मेळघाट विधान सभा क्षेत्रामधील जनतेने या मदतीचे कौतुक केले आहे.घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत संपर्कात असून मला संपर्क करून घटनेची नियमित माहिती घेत आहेत. बुधवार ला मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना अप्रिय घटनेची सविस्तर माहिती देणार आहे व मृतकाचे कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाकडूनअधिक मदत मिळण्याच्या दृष्टीने वाढीव सानुग्रह अनुदान आर्थिक मदत देण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार राजकुमार पटेल यांनी बोलताना सांगितले
मेळघाटातील अतिसाराने मृतकाना माजी राज्यमंत्री आ.बच्चू कडू व आ.राजकुमार पटेल यांच्या प्रहार पक्षकडून कडून प्रत्येकी 1 लाखांची मदत...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
