राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील टेंब्रूसोंडा जामली चिचखेडा क्षेत्रातील सोयाबीनवर मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी केसाळ अळीच प्रार्दुभाव झाल्यानें संपूर्ण सोयाबीन चे शेतच अळ्यानी उध्वस्त केल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे .तालुक्यातील टेब्रुसोंडा जामली भागात केसाळ अळी मोठ्या प्रमानात सोयाबीनबर पडल्याने त्यावर काय उपाययोजना करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे .कृषी विभागाकडून ही त्यावर ठोक उपाययोजना होत नसल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.यावर्षी पावसाची अनियमितता व मुळे आधीच बळीराजा कर्जबाजारी आहे अन् त्यात आता हे नवी नैसर्गिक आपत्ती आल्याने संपूर्ण शेतातील पीक नष्ट झाले.त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली दुबार पेरणि चि वेळ हि निघुन गेलाआहे.शेतकऱ्यांचे त्वरित व पंचनामे करा अशे आदेश जिल्हा कृषि अधिकारी यानि दिलेआहे.
