दिनांक.१९ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये श्री विठ्ठल सेवा समितीच्या वतीने फराळाचे वितरण करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी आ. डॉ.संजय कुटे,ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या सह भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल सेवा समितीचे अध्यक्ष गजानन सरोदे, भाजप तालुका अध्यक्ष परीक्षेत ठाकरे,वसंत राव वारूळकर,भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्रशेठ ढोकने,भाजपाशहराध्यक्ष अभिमन्यू भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ह्यावेळी. श्री विठ्ठल सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित श्री भक्तांना साबुदाण्याच्या खिचडीचे वितरण केले.ह्या कार्यक्रमास निलेश शर्मा,रामा इंगळें,मोहन भुजबळ, बाळू पाटील,सेनेचे संतोष बोरसे,तुषार टापरे, नंदकिशोर काठोटे, अशोक मुरुख,अंबादास शेळके,ऍड दिलीप खोद्रे, अनंता कराळे,हणमंतराव देशमुख,सुनील टापरे,करनसिंगग गुरुजी,बंडू भागवत,रामा मिरगे, पंकज देशमुख, गुलाबराव इंगळें,राजेश बाठे,प्रीतम ठाकूर,सचिन कल्याणकर,मोहित पाटील,गणेश दांडगे यांची सुद्धा उपस्थिती होती.चौकातील,बस स्थानक परिसरातील आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनी सुद्धा फराळाचा लाभ घेतला.
श्री विठ्ठल सेवा समितीच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त फराळाचे वाटप...
जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-
