दहीहंडा येथील नाल्याचा काठ पुरामुळे खचल्यामुळे ४२ कुटुंबांचा जीव धोक्यात..नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचे आ.रणधीर सावरकर यांचे निर्देश...


अकोला जिल्हा प्रतिनिधी:-

अकोला जिल्ह्यातील दहीहांडा येथील स्थानिक लेवडी नाल्याचा  ५० फुटा पेक्षा अधिक उंच असलेला काठ अतिवृष्टी व पुरामुळे तसेच नाल्याचा प्रवाह बदलल्याने सुमारे ४२ कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे.अलीकडे झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मयूर संतोष भोंडे नावाचा मुलगा खचलेल्या  नाल्याच्या  पात्रात पडून जबर जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालय अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते.त्याचा योग्य तो इलाज करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला सूचना करण्यासोबतच आपतग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी तहसीलदार अकोला यांना सूचना केल्या आहेत.दहीहांडा येथील पूर व अतिवृष्टीमुळे खचत असलेया लेवडी नाल्याची काल  मोका पाहणी करून बाधित  होणाऱ्या कुटुंबीयांसोबत आमदार रणधीर सावरकर यांनी संवाद साधला. यावेळी तहसीलदार सुनील पाटील, जलसंपदा विभाग  कार्यकारी अभियंता वसूलकर . अभियंता घुगे, अभियंता कासर, तलाठी देशपांडे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते,

Previous Post Next Post