अहिल्या 24 न्यूज चे संपादक पत्रकार शिवदास सोनोने यांच्यावर हल्ला... प्रकरणी आरोपीवर जळगाव पोस्टेला गुन्हे दाखल..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे रहिवासी असलेले अहिल्या 24 न्यूज चे संपादक व पत्रकार शिवदास सोनोने यांच्यावर दिनांक 14 जुलै रोजी घरामध्ये बसलेले असताना त्यांच्याच घराबाजूला राहत असलेल्या भारती राजपूत या महिलेने पत्रकार शिवदास सोनोने यांना आवाज देऊन घरातून बाहेर बोलाविले व जोर जोरात माझ्या आईकडून घेतलेले तीन हजार रुपये दे म्हणून शिवीगाळ केली. पत्रकार शिवदास सोनवणे यांनी त्या महिलेस म्हटले की तुझ्या आईचे 3000 मी केव्हाच देऊन टाकले. आता तुझ्या आईचे कोणतेच पैसे माझ्याकडे नाही आहेत. तू तुझ्या आईला विचारून घे असे म्हटले असता आरोपी विक्रमसिंग राजपूत यांनी शिवदास सोनोणे यांना लोटपाट केली. व शिवदास सोनोणे यांच्या अंगावर दगड भिरकावला तसेच पत्नी गीता सोनोणे यांना महिला आरोपी भारती राजपूत हिने मारहाण केली.तसेच पत्रकार शिवदास सोनोने यांच्या गाडीच्या लाकडी दांड्याने काचा फोडल्या त्यामध्ये त्यांचे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले. तसेच पत्रकार शिवदास सोनोणे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. यामुळे शिवदास सोनवणे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला धाव घेत घटनेची फिर्याद दिली असता आरोपी विरोधात कलम 324 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले तसेच आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली. तसेच आरोपी विक्रम सिंह राजपूत यांच्यावर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत 2020 मध्ये एका कुटुंबाला घरामध्ये जाऊन मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post Next Post