पदे जाण्याच्या भीतीने नगरपंचायतला भाजप, वंचीत लोकप्रतिनिधींचा विरोध?आक्षेपकर्त्यांबद्दल जनतेत संतप्त भावना.स्वार्थापोटी केलेले आक्षेप फेटाळून तात्काळ नगरपंचायत निर्मिती करावी.. जनतेची मागणी..


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

बावीस वर्षांच्या सामूहिक संघर्षानंतर शासनाने 13 जून रोजी हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक उद्घोषणा केली आहे.परंतु आपली पदे जाऊ नये या स्वार्थापोटी भाजप आणि वंचित च्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी नगरपंचायत होऊ नये यासाठी स्वतः व काहींना हाताशी धरून  शासनाकडे लिखित स्वरूपात आक्षेप दाखल केल्याची माहिती उघड झाल्याने हिवरखेड शहरातील सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.हिवरखेड नगरपंचायत चे शासनाने प्राथमिक उद्घोषणा केल्यानंतर कोणाला काही आक्षेप हरकती असल्यास 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले अक्षर दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. नेमकी हीच संधी साधत भाजप आणि वंचितच्या स्थानिक पंचायत समिती सदस्यांनी आपली पदे जाऊ नये या स्वार्थापोटी काही तथ्यहीन व प्रभावशून्य मध्ये टाकून लेखी आक्षेप दाखल केले आहेत. एकूण 21 जणांनी लिखित आक्षेप हरकती दाखल केलेल्या असून सर्वात हास्यास्पद आणि आश्चर्याची बाब ही आहे या सर्व तक्रारींमध्ये की फक्त दोन प्रकारचा छापील मजकूर असून सर्व तक्रारी पूर्णतः कॉपी-पेस्ट प्रकारे एकसारख्याच आहेत. फक्त वेगवेगळ्या नावाने केलेल्या आहेत. यापैकी काही अपवाद वगळता अनेक सर्वसामान्य युवकांना अंधारात ठेवून अथवा इतर कारणे सांगून अथवा दबाव तंत्राचा वापर करून त्यांच्या सह्या घेतल्या गेल्याची चर्चा सुद्धा अनेक नागरिक खासगीत बोलताना करीत आहेत. आपण केलेला विरोध कोणाला कळणार नाही व आपली पदे सुद्धा जाणार नाहीत. असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा. परंतु ही एकवीस नावे आणि तक्रारी सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असल्याने सर्वांचे पितळ जनतेसमोर उघडे पडले आहे. यापैकी अनेक आक्षेप कर्त्यांना तर यामध्ये आपले नाव कसे आले व आपण तर नगरपंचायत चे विरोधक नाही आपली सही तर इतर कुण्या व्यक्तींनी इतर कोणती कारणे सांगून दगापटक्याने घेतल्या गेल्याचे त्यांना उशिरा लक्षात आले. सर्व तक्रारी सारख्याच असल्यामुळे या तक्रारींमागे करता आणि करविता आणखीनच कोणीतरी जाणकार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.दुसरीकडे भाजपच्या आणि वंचितच्या लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात विरोध दर्शविल्यामुळे त्यांना विरोध दर्शविण्यासाठी आपल्या पक्षाची, पक्ष पदाधिकाऱ्यांची, आमदारांची, व इतर वरिष्ठांची संमती होती का? वरिष्ठांसोबत विरोध दर्शविण्यासाठी चर्चा करण्यात आली होती का? याचे उत्तर आता स्वतः दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जनतेसमोर स्पष्ट करणे गरजेचे आहे जर हा सर्व प्रकार पक्षाला व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केल्या गेला असेल तर भाजप व वंचित हे दोन्ही पक्ष आपल्या लोकप्रतिनिधींवर काय कारवाई करतील असा सवाल सुद्धा सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.एकीकडे हिवरखेड नगरपंचायतच्या 22 वर्षाच्या संघर्षात सर्वसामान्य नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला आहे. आदर्श पत्रकार संघामार्फत आयोजित केलेल्या निर्णायक रक्तसंकल्प अभियानात सुद्धा सर्वसामान्य जनता सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या सोबतच भाजप व वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सुद्धा रक्तदान करून आपल्या रक्ताने शासनाला पत्र लिहून नगरपंचायत निर्मितीची मागणी केली होती. त्यामुळे विरोधाचा हा प्रकार उजेडात येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. विरोध करणाऱ्यांबाबत सोशल मीडियामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून ज्येष्ठ पक्ष पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायतला विरोध करणाऱ्यांची नावे

सौ गोकुळा महेंद्र भोपळे (पं स सदस्य भाजप)

सदफ नाजमीन अ आदिल (पं स सदस्य वंचित)

ज्ञानेश्वर रमेश राऊत

सुनील चिरंजीलाल बजाज

राम सुरेंद्र भोपळे

शिवा आनंदा ढगे

विशाल पांडुरंग कुलट

राजेश मनोहर इंगळे

प्रदीप मुरलीधर इंगळे

मंगेश काशीराम कोष्टे

सागर मंगल धुरदेव

बाळकृष्ण भगवान वाकोडे बाळकृष्ण ओंकार सदाफळे विशाल विजय बैस

अनुप बंडूभाऊ धुरदेव

शरद जयप्रकाश इंगळे

गजानन शालिग्राम ताळे

अमोल रामकृष्ण ढबाले

शेख नईम शेख नजीर

रवी राजाराम धारपवार

रोहन झगडे

Previous Post Next Post