नगरपरिषद कार्यालय जळगाव जामोद येथे विविध मागण्यासाठी लक्षवेधी आंदोलन...


 जळगाव जा.प्रतिनिधी :- 

गेली अनेक दिवसांपासून जळगाव जा. शहराध्ये समस्यांचा पाढाच असलेल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचा लक्ष वेधण्याकरता विविध प्रश्न घेत नागरिकांनी आंदोलन केले.यामध्ये शहरांमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो मागील वर्षी या जणांमुळे दोन-तीन जीव सुद्धा गेले त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे. तर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज बागेच्या बाजूला घाणीचे साम्राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता करून बाजूला  जागा उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून त्या ठिकाणी राहील.आणी शाळा क्रमांक २ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व साफसफाई कर्मचारी उपलब्ध करून द्या.ह्या मागण्यांकरिता नागरिकांनी अनेक वेळा तोंडी तसेच लेखी निवेदन देऊन सुद्धा झोपलेले नगरपरिषद प्रशासन हे आपल्या कर्तव्याची आपल्या कामाशी ढवळाढवळ करत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला अंत होत आज दिनांक १९ जुलैला नगर परिषद कार्यालय जळगाव जामोद येथे लक्षवेधी आंदोलन केल्यामुळे या प्रश्नांची दखल घेत नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देत प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले.यावेळी युवा आंदोलक अक्षय पाटील , अश्फाक देशमुख, अजय गिरी , तुकाराम पाटील, जनार्दन मोरखडे, गणेश सिंग परिहार, सोपान पाटील, गजानन व्यवहारे, राजु नितवने,अजय नितवने, श्रीराम व्यवहारे, संतोष इंगळे, पुरुषोत्तम गायकी, देवेंद्र सोमवंशी,शेख अस्लम,शेख करीम, इम्रान काझी, सोनु पाटील तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post